अडगळ
प्रत्येक घरात एक अडगळीची जागा असते जिथे जुन्यापुराण्या किंवा कधीतरीच वापरात येणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या असतात , तसच आपल्या मनातहि कोठेतरि अशीच अडगळ असते त्यात नकोश्या वाटणार्या , काहीवेळा जपून ठेवलेल्या ,काही अंधुक,काही स्पष्ट ,काही पांढर्या ,काही काळ्या , काही रंगीन तर
काहीवेळा "Personal Secrets" असा Tag लावून ठेवलेल्या ...आठवणी!
बरं या फक्त आठवणीच नसतात त्या सोबतही असते बरच काही..!
पण एक गोष्ट आहे... आपल्याला तिथं जाऊ ही वाटत नाही अनं ती अड़गळ काढूही वाटत नाही..
आणि राहतात त्या तश्याच भूतकाळाचे अव्यक्त भावपुंज्य बनून.. :)